चिंचवडमध्ये कांटे की नव्हे,‘काटे से टक्कर’ – आदित्य ठाकरे,चिंचवडमध्ये परिवर्तनाचे वारे; नाना काटे यांचा विजय निश्चित


चिंचवड :- गद्दारांना हाताशी धरून भाजपने राज्यात घटनाबाह्य सरकार आणले आहे. या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा आक्रोश असून नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही बदलाचे वारे वाहत असून या ठिकाणी ’कांटे की टक्कर नसून काटे से टक्कर है’, त्यामुळे चिंचवडमध्येही जनताच परिवर्तन घडवून आणेल आणि नाना काटे यांना विजयी करेल, असा ठाम विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा सोमवारी (दि. 13) वाल्हेकरवाडीत संयुक्त मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते
. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
.पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पाठीत चाळीस वार करून सध्या राज्यात गद्दारांचे खोके सरकार अस्तित्त्वात आले आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि अल्पआयु ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हे सरकार निश्चितच कोसळेल याचा मला ठाम विश्वास आहे. या सरकारबद्दल राज्यातील जनतेत प्रचंड रोष, चिड आणि आक्रोश आहे. आम्ही सत्तेत असताना करोना काळात देखील शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची मदत केली होती. मात्र या सरकारच्या काळात राज्याची प्रगती थांबली असून शेतकरी आत्महत्या करत आहे. सध्याच्या राजकारण अत्यंत घाणेरडे झाले असून त्यात बदल करावा लागणार आहे. त्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणाबाजी केल्याने सभास्थळ दणाणून गेले होते.
.महाशक्तीला ताकद दाखवा – पटोलेमहाराष्ट्रामुळे करोना देशात पसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रावर सातत्याने त्यांची वकृदृष्टी आहे. देशाची सार्वजनिक संपत्ती विकून देश चालविला जात आहे. कृत्रिम महागाई निर्माण केली आहे.
तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकरी, छोटे व्यापारी यांना बरबाद करत आहेत. पंतप्रधान संसदेत पान टपरीवाल्यासारखे भाषण करत आहेत. मात्र, लोकशाहीत घमंड चालत नाही. या महाशक्तीला जमिनीवर आणण्यासाठी महाविकास आघाडीची ताकद द्यावा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. भाजप वातावरण पसरविण्यात पटाईत आहे. चिंचवडमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे सांगितले
जाते. मात्र, कोणतीही सहानुभूती नाही. महापालिकेत भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. सत्तेची घमेंड आलेल्या लोकांना, खोके, बेईमानी करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे पटोले म्हणाले.पालिका निवडणुकीत सर्वांना न्यायमहापालिका निवडणुकीबाबत काही काळजी करु नका, व्यवस्थित, राजकीय ताकदीप्रमाणे जागा वाटप केले जाईल
. आताच्या काळात आपल्या मतांची विभागणी होणे परवडणारे नाही. एक-एक मत महत्वाचे आहे. गाफील राहू नका, गैरसमज करु नका. पोटनिवडणुकीतील विजय आपल्याला महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकदीप्रमाणे स्थान दिले जाईल, असेही पटोले म्हणाले.