…पण भाजपातील काही इच्छुक टिळक यांच्या मरणाची गिधाडा सारखी वाट पाहत होती…

Ashok Chavan यांच्या उपस्थितीत आज कसबा पोटनिवडणुकीसाठी जाहीर सभेचे महाविकास आघाडीच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणात अरविंद शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली ‘सीआयडी, ईडी, आयकर विभाग, पोलीस हे कधीतरी हेमंत रासने यांच्या घरी पाठवा ना. ५०० कोटी रुपये काय केले?” असा सवाल त्यांनी भाषणाततसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, “महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील पीएमपीएलचे ऑफिस तोडून अधिकारी नसताना कॉम्प्युटरवर अॅक्सेस केलं होतं. पण आजपर्यंत त्यांच्यावर पोलीस करवाई झाली नाही. मुक्ता टिळक या अडीच वर्ष आजारी होत्या. अनेकजण त्यांना भेटायला जात होते. पण भाजपातील काही इच्छुक टिळक यांच्या मरणाची गिधाडा सारखी वाट पाहत होती,” अशी जहरी टीका पुणे शहर जिल्हा काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज प्रचारसभेत केली.अरविंद शिंदे म्हणाले, ”मुक्ता टिळक अडीच वर्ष आजारी होत्या. अनेक जण त्यांना भेटायला जात होते. पण भाजपमधील काही इच्छुक त्यांच्या मरणाची गिधाडा सारखी वाट बघत होते. मुक्ताताईंनी केलेल्या विकासाचे काम हेच हेमंत रासने थांबवत होते. हे मी सांगत नाही तर मुक्ताताईंचे पती शैलेश टिळकांनी (Devendra Fadnavis) यांना सागितलं आहे. मात्र, तरीही असा उमेदवार देता ज्याने मरण्याची वाट बघितली. यांना लाज वाटली पाहिजे”, असा घणाघात शिंदेंनी केलाते म्हणाले, ”हेमंत रासने सलग ४ वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. महापालिकेचे अंदाज पत्रक त्यांनी लागोपाठ चार वर्ष सादर केले. म्हणजे २८,००० कोटींचे अंदाजपत्रक हेमंत रासने यांनी सादर केले. त्यांच्या प्रभागात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण तिथे विकासाची कामे केले नाही. हा प्रश्न प्रत्येक मतदाराने उमेदवाराला विचारले पाहिजेत्यांनी २९८ कोटी रुपयांची माफी बस कॉन्ट्रॅक्टर यांना दिली. ज्यांनी कोविड काळात बसच चालवली नाही त्यांना आता कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रभारी केलं आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

Latest News