मनसे च्या पाठिंब्याबद्दल कायम ऋणी राहीन-अश्विनी जगताप

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) काल सशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांची कायम ऋणी राहीन, अशी भावना चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज व्य़क्त केली.

राज ठाकरे यांनी शब्द पाळल्याबद्दल त्यांना अश्विनी जगताप यांनी धन्यवाद दिले आहेत. मनसेने पाठिंबा दिला असला, तरी ते भाजपच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तरीही, त्याबद्दल महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी राज ठाकरे, त्यांच्या नेत्यांचे आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सचिन चिखले यांचे आभार मानले आहेत

…पतीच्या निधनाचे दुःख अजून विरलेही नसताना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली. अशा कठीण प्रसंगी मनसे आणि त्या पक्षाचे प्रमुख ठाकरे हे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन, अशा भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत

यासंदर्भात अश्विनी लक्ष्मण जगताप प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, “माझे पती आणि शहराच्या विकासाचे शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आम्हा जगताप परिवारावरच नाही तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरण्यासाठी राज्यातील आणि शहरातील अनेक नेत्यांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी आम्हाला आधार दिला

आमच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आमच्या घरी येऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच माझ्याशी संवाद साधून कोणत्याही प्रसंगात भावासारखे पाठीशी उभे राहण्याचे वचन त्यांनी मला दिले होते. ते पाळले.नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे यांनी भाजप शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सदस्य अनुप मोरे यांच्यासोबत आज बैठक घेऊन काल जाहीर केलेला पाठिंबा दिला. राज ठाकरे हे राज्यातील एक मोठे मन असणारे नेते आहेत

Latest News