परिवर्तनासाठी निवडून द्या : हुसेन(दादा) शेख….कसब्यातील अपक्ष उमेदवाराचे आवाहन

IMG-20230216-WA0026

परिवर्तनासाठी निवडून द्या : हुसेन(दादा) शेख………………

.कसब्यातील अपक्ष उमेदवाराचे आवाहन

पुणे :कसबा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी, व्यापक परिवर्तनासाठी निवडून द्यावे, असे आवाहन कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार हुसेन (दादा ) शेख यांनी केले आहे. आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे.

शेख हे कागदीपुरा येथील रहिवासी असून सर्वसामान्य माणसाच्या जगण्याच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी या पोटनिवडणुकीत उभे आहेत.’ या मतदारसंघात शैक्षणिक अनुशेष, बेरोजगारी, पाणी प्रश्न, अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, खराब रस्ते या समस्या आहेत

. माझ्याकडे परिस्थिती बदलण्याची इच्छाशक्ती , नव्या कल्पना आहेत. करदात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. ‘ असे शेख यांनी म्हटले आहे. दूरदर्शन संच ही त्यांची निवडणूक निशाणी आहे

Latest News