निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? – प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी सल्ला दिला आहे. आंबेडकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊनयांनी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेलकेंद्रीय निवडणूक आयोगाने काल (शुक्रवारी) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.”केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे