खिल्ली मधील ‘एका गांधी टोपीचा प्रवास


गणगोत मधील ;दिनेश’, ‘संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे’, ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे’, ‘रामुभैय्या दाते’, ‘रावसाहेब’ या कथा अभिनेता सौरभ गोगटे यांनी वाचल्या आहेत तर खिल्ली मधील ‘एका गांधी टोपीचा प्रवास'(अजय पुरकर), ‘पु. ल. तुम्ही स्वतःला कोण समजता?'(अविनाश नारकर), ‘भाईसाहेबांची बखर'(दिलीप प्रभावळकर), ‘तू माझी ‘माऊ’ ली’ (संदीप खरे), ‘शेवटचे कवी – संमेलन'(संदीप खरे), ‘हवाई सुंदरी, दूरध्वनिकर्णिका आणि सौजन्य'(चिन्मय मांडलेकर), ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?'(अविनाश नारकर), ‘काही नव्या राजकीय ध्वनिमुद्रिका'(नचिकेत देवस्थळी), ‘यशवंतराव भागिले यशवंतराव'(अजय पुरकर), ‘आम्हांलाही उबाग'(अविनाश नारकर), ‘आम्ही सूक्ष्मात जातो'(संदीप खरे), ‘आठ आण्याचे गणित'(दिलीप प्रभावळकर), ‘लोकमान्य आणि आम्ही'(संदीप खरे), ‘लोकशाही: एक सखोल चिंतन'(चिन्मय मांडलेकर), ‘जनता शिशुमंदिरात आम्ही'(संदीप खरे), ‘मी – हारून अल रशीद'(अविनाश नारकर), ‘अंतुलेसाहेब, तुम्हारा चुक्याच'(नचिकेत देवस्थळी) या मान्यवरांच्या आवाजात ऑडिओ बुक्समध्ये स्टोरिटेलवर वरील सर्व साहित्यकृती रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.
‘स्टोरीटेल’ या जगविख्यात समूहाने मराठीतील दर्जेदार साहित्य नामवंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर आणूनते दीर्घकाळ टिकावे आणि नव्या पिढीसाठी हा वारसा सर्वोत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ‘ऑडिओ बुक्स’च्या माध्यमातून जतन करण्याचे बहुमोल कार्य गेल्या पाच वर्षांपासून सुरु केले आहे
. आपल्या भाषेतील दर्जेदार आणि दुर्मिळ साहित्य अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टोरिटेलने आपले जगभरातील लोकप्रिय व्यासपीठ उपलब्ध करून मराठी साहित्यप्रेमी रसिकांची आवड जोपासली आहे
.’स्टोरीटेलवर ‘एप्रिल पुल’ मधील पुलंचं लोकप्रिय साहित्य ‘ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू.१४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- भरून मराठी भाषेतील हजारो ऑडिओबुक्स ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.