शिक्षक मतदारसंघात आसगावकरांना धक्का कौस्तुभ गावडेंची विजय…

पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा उलटफेर; जयंत आसगावकर पराभूत, कौस्तुभ गावडे आघाडीवर
पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत ते बाद झाल्याने भाजपपुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
जयंत आसगावकरांना धक्का; गावडेंची आघाडी कायम
दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत जयंत आसगावकर यांना ८,९६५ मते मिळाली आणि त्यांना निवडणुकीतून बाद व्हावे लागले. दुसरीकडे, कौस्तुभ गावडे यांनी १८,३८५ मतांसह आघाडी कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा पाठिंबा असलेले प्रा. सचिन सानप ११,९८३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
विजयासाठी २५,७५६ मतांचा कोटा
पुणे शिक्षक मतदारसंघात ५१,५११ मते वैध ठरली, तर १,६७५ मते बाद झाली. विजयासाठी २५,७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक कोटा पूर्ण करण्यासाठी पुढील पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरू शकते.
पुणे पदवीधर मतदारसंघातही चुरस
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात लढत झाली. दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय जाहीर करण्यात आला आहे.
