आर. के. बन्ने (अण्णा) यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार जाहीर*

आर. के. बन्ने (अण्णा) यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार जाहीर*

पुणे : ज्योतिष विश्वात मानाचा समजला जाणारा ‘ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार’ कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे ज्येष्ठ अभ्यासक व ग्रंथ लेखक आर. के. बन्ने (अण्णा )यांना जाहीर झाला आहे.

२०, २१ ऑगस्ट रोजी पुणे येथे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन होणार आहे.या अधिवेशनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अधिवेशनाचे कार्याध्यक्ष उल्हास पाटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

हे अधिवेशन पुणे येथील उद्यानप्रसाद मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे असणार आहे.*अधिवेशनात १२ ज्योतिषांचा मोफत सल्ला*अधिवेशनाचे हे ४१ वे वर्ष असून त्यानिमित्त दोन दिवस १२ ज्योतिषांचा मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चंद्रकांत शेवाळे ( रमल ज्योतिष ), एड .प्रफुल्ल कुलकर्णी ( हस्त सामुद्रिक ), डॉ. जयश्री बेलसरे, ( पारंपारिक ज्योतिष ), कैलास केंजळे ( कृष्णपद्धती ज्योतिष), गौरी केंजळे(मोबाईल न्युमरोलोजी), उमेश कुलकर्णी ( वास्तू ज्योतिष ), अपर्णा गोरेगावकर ( टॅरो ज्योतिष),जानकी पाचारणे( डाऊजिंग ), मुग्धा पत्की (लाल किताब), संजय साळुंखे(पंचांग ज्योतिष ), उषाताई कांबळे( समस्या निवारक उपाय ), रजनी साबदे ( नक्षत्र ज्योतिष)

Latest News