मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे – मनोज जरांगे-पाटील



ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

मराठा समाजाला वंशावळी नोंद सादर करण्याची अट रद्द करून सरसकट मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जावे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु त्यांनी वंशावळ नोंद सादर करण्याची अट मागे घेऊन सुधारणा करावी. या सुधारणा होईपर्यंत आमचे उपोषण आंदोलन सुरूच राहणार आहे,” असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे,

म्जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सरकारच्या निर्णयाचे स्वागत परंतु, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळीची अट मागे घेऊन त्यात सुधारणा करावी. या अटीमुळे मराठा समाजाला फायदा होणार नाही. ही सुधारणा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

“बहुतांश मराठा समाजाकडे वंशावळाच्या नोंदी उपलब्ध नाहीत, यामुळे त्यांना कुणबी म्हणून जातीचे प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा मिळणार नाही. “”सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढलेत. पंरतु या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत आली नाही

. माध्यमांकडून काही मुद्दे समजले आहेत. मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे परंतु आमची मागणी आहे की, “बहुतांश लोकांकडे वंशावळीच्या नोंदी उपलब्ध नाही. त्यामुळे वंशावळीची अट रद्द करून सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, सरकारने घेतलेल्या त्यांच्या निर्णयात सुधारणा केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Latest News