धनगर आरक्षण कृती समितीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरोधात भंडारा उधळून निषेध ….


सोलापूर (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-))
धनगर समाजामध्ये सरकारविषयी असंतोषाची भावना असल्याचे दिसून येत आहेदरम्यान, पालकमंत्री विखे पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.आज सकाळी आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे व इतर आले होते. बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिले. निवेदन वाचत असतानाच बंगाळे यांनी पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली
राज्यातील धनगर समाजाचा समावेश एसटीमध्येकरण्यात यावा, यासाठी समाजाच्या वतीने अनेक वर्षांपासून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, सरकारी पातळीवर याचा विचार होताना दिसत नाही.
राज्यात मराठा आरक्षणाचा वाद ऐरणीवर आलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत त्यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्या वेळी तिथे उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, इतर पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी बंगाळे यांना मारहाण केली.
आरक्षणासाठी लढणाऱ्यांना मारहाण करणाऱ्या काळे यांचा धनगर समाजातून निषेध करण्यात येत आहेपालकमंत्र्यांसमेवत उपस्थित असलेले शहराध्यक्ष नरेंद्र काळे व इतरांनी आक्रमक होत बंगाळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष इंद्रजित पवार व इतरांनी मध्यस्थी करत बंगाळे यांची सुटका केली. मात्र, धनगर आरक्षणासाठी लढणारे बंगाळे यांना धनगर समाजाचे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केल्याने समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
बंगाळे यांना झालेल्या मारहाणीचा शहरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन भाजपचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंदोलनकर्त्यांना दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण तत्कालीन सरकारकडून धनगर समाजासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या.