मनोगीते’ कार्यक्रम कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

IMG-20231008-WA0347

‘ मनोगीते’ कार्यक्रम कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद …. …………….

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ मनोगीते’ या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

‘स्वरमंगला’ प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार, ८ ऑकटोबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.गीतकार,संगीतकार कै.मनोहर केतकर यांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाची निर्मिती मंगला चितळे यांची होती. लेखन , निवेदन जयश्री कुबेर यांचे होते.

ज्योती करंदीकर, वर्षा भिडे, मंजिरी जोशी, अर्चना भागवत, संगीता जोशी, प्रीती गोरे, माधवी पोतदार या गायिका सहभागी झाल्या.पराग पांडव, अदिती गराडे, उध्दव कुंभार, चारुशीला गोसावी यांनी साथ संगत केली.शिक्षक, गीतकार आणि संगीतकार मनोहर केतकर यांना “मनोगिते ‘, या कार्यक्रमाद्वारे स्वरसुमनांजली वाहण्यात येत आहे,

अशी माहिती कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या मंगला चितळे यांनी सांगितली.या मनोगिते कार्यक्रमात केतकर यांची स्वतः लिहिलेली गीते तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनाही यावेळी सादर करण्यात आल्या.

उपस्थितांनी या सर्व सुंदर गीतांना व मधूर चालींना आणि केतकर यांच्या चालींना उत्फुर्त टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद आणि दाद दिली.केतकर यांनी गझल, भावगीत, भारूड, लावणी अशा विविध प्रकारात रचना, कविता लिहिली आणि वेगळ्या चालीत बांधली.आजच्या कार्यक्रमात रामदास स्वामी यांची रचना ‘नट नाट्य कला कुसरी, नर छंदे नृत्य करी ‘ हे चितळे यांनी गावून कार्यक्रमाचा सुमधूर आरंभ केला.

‘रूप पाहता लोचनी ‘या ज्ञानेश्वरांच्या अभंगाला अतिशय वेगळी आणि रसाळ चाल केतकर यांनी लावली त्याचे तितकेच सुंदर सादरीकरण सर्व गायकांनी केले. स्वतः केतकर यांनी लिहिलेल्या ‘गुरूराया शरण जावे ‘, ‘उधळली सतेज कणक फुले ‘, ‘ वाट जाते पंढरीसी ही गवळण ‘, ‘कृष्णे वेधिली विरहिनी बोले ही विराणी ‘अशा रचनाही गायकवृंदांनी सादर केल्या

.’या सौख्यपुर्णतेचा ओलाव अमृताचा ‘, आणि ‘ भारूड आला आला गारूडी आला ‘ या केतकरांच्या लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचना शेवटी सादर झाल्या. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८३ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले

Latest News