इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये श्रेया घोषाल शुभदीप दासला म्हणाली, “एक दिवस तू नक्की मोठा गायक होशील”


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो देशातील विविध प्रांतांमधून आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आलेल्या प्रतिभावान गायकांचे केंद्र बनला आहे. ‘एक आवाज लाखों एहसास’ या सूत्राला स्मरून यंदाच्या सत्रात असे काही विशेष आवाज प्रेक्षकांसमोर येणार आहेत,
जे प्रेक्षकांच्या मनात नानाविध भावना जागृत करतील. इंडियन आयडॉल 14 ची ऑडिशन फेरी दणक्यात सुरू आहे आणि यंदाचा उत्साह काही वेगळाच आहे कारण यावर्षी सुमधुर कंठाची प्रज्ञावान गायिका श्रेया घोषाल हिने देशातून उत्कृष्ट प्रतिभा हुडकून काढण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय तिच्या सोबत असणार आहे
लोकप्रिय गायक कुमार सानू, जो पहिल्यांदाच परीक्षक म्हणून काम करत आहे आणि ज्याच्याकडे संगीत क्षेत्रातील अनुभवांचा खजिना आहे. त्याचबरोबर विशाल दादलानीला देखील विसरून चालणार नाही. तो आवाजाचा पोत, रेंज आणि गाण्यातील अचूकता या निकषांवर स्पर्धकांची पारख करणार आहे.
या वीकएंडला देशाच्या मातीतून आलेले अनेक उभरते गायक स्पर्धेत सहभागी होण्याच्या उद्देशाने आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी या मंचावर येतील. यापैकी एक स्पर्धक आहे, मुंबईहून आलेला शुभदीप दास. तीन वर्षांनंतर तो यावेळी पुन्हा सहभागी होण्यासाठी आला आहे. आपल्या बंगाली पार्श्वभूमीला साजेसे ‘भूल भुलैया 2’ चित्रपटातील ‘आमी जे तोमार’ हे गाणे तो सादर करताना दिसेल.
त्याच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रभावित झालेला विशाल म्हणाला, “मी तीन वर्षांपूर्वी तुला इंडियन आयडॉल मध्ये ऐकले होते. त्यावेळी तुझे गाणे जरा कच्चे वाटले होते, पण आता तू स्वरांवर हुकूमत मिळवली आहेस, ती असामान्य स्वरूपाची आहे.” त्याला पुस्ती जोडत श्रेया घोषाल म्हणाली,
“मला तुझा परफॉर्मन्स फारच आवडला, तो बघण्यासारखा देखील होता! मला विशालकडून समजले की तू गेली तीन वर्षे खूप मेहनत घेत आहेस. तुझे पुनरागमन जोरदार आहे! मी ‘आमी जे तोमार’ हे गाणे वेगवेगळ्या शैलींमध्ये ऐकले आहे आणि हे अगदी स्पर्धेत गाण्याजोगे गीत आहे. पण गाण्यातील सफाईचा अभाव मला नेहमी जाणवतो. तू मात्र अद्भुत गायक आहेस. शास्त्रीय संगीताची तुझी बैठक मजबूत आहे. उत्तम आलाप आणि खालच्या पट्टीतील सूर नेमके लागणे ही उत्तम गायकाची लक्षणे आहेत. तू एक दिवस नक्की मोठा गायक होशील!”
यानंतर खुद्द श्रेया घोषाल शुभदीपसोबत ‘आमी जे तोमार’ सादर करताना दिसेल.
मुख्य प्रश्न हा आहे की, शुभदीपच्या परफॉर्मन्सबद्दल त्याला गोल्डन माइक मिळणार का?
बघायला विसरू नका इंडियन आयडॉल या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!