OBC Reservation: ओबीसींमध्ये आरक्षण ही जरांगे यांची मागणी चुकीची- मंत्री राधाकृष्ण विखे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘ओबीसींमध्ये आरक्षण ही जरांगे यांची मागणी चुकीची आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. जरांगेंनी मागणी इतरत्र नेऊ नये ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण दिले. मात्र मविआच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेलेराज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहेमागणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.गेल्या महिन्यात जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले होते. त्यानंतर आज अंतरवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. या सभेला लाखो जणांनी हजेरी लावली. जरांगे पाटील या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणी अधिक आग्रही असल्याचे दिसून आले. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे’मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र, ओबीसीत आरक्षण मागणे योग्य नाही. निजाम काळातील कुणबी दाखले मिळत असतील तर हरकत नाही.