राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक शिर्के


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक शिर्के
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी दीपक शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दीपक शिर्के हे माजी सैनिक असून ‘साई डिफेन्स अँड पोलीस करियर अकॅडमी'(लोहगाव,पुणे)चे संस्थापक अध्यक्ष आहेत.या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची कारकीर्द त्यांनी घडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात करण्यात आली.
‘देशाच्या सुरक्षिततेसाठी सैनिकांचे फार मोठे योगदान आहे. निवृत्तीनंतरही माजी सैनिक सामाजिक कार्याचा वसा पुढे नेतात. या सेलच्या माध्यमातून माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहाल’, असा विश्वास खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला
आणि श्री. शिर्के यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे, सांस्कृतिक विभागाचे मंगेश मोरे, माजी सैनिक पदाधिकारी प्रदिप डावकर , माजी सैनिक पोपटराव पडवळ , माजी सैनिक अमित मोहिते -पाटील , माजी सैनिक श्रीमंत राठोड , चंद्रकांत गायकवाड , तातेराव मुंडे , माणिकराव मुंडे , सुधीर शिंदे , अविनाश ढोले- पाटील, चंद्रकांत ढेंबरे , लालदास पवार, साखरे , भरत राऊत , दत्तात्रय सुके , संजय वाघ , बबन बोऱ्हाडे , अजित काटे , अविनाश मोहिते , समीर तुपे , माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते