हिंमत असेल तर PM फंडपासून काश्मीरपर्यंतची चौकशी करा: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
‘उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी ते मराठा आंदोलनपर्यंत झालेल्या घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केला. ‘हिंमत असेल तर PM फंडपासून काश्मीरपर्यंतची चौकशी करा, असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं
हिंमत असेल तर पीएम फंडपासून काश्मीरपर्यंत चौकशी करा. आम्ही मुंबई वाचवल्याचा अभिमान बोलून दाखवत नाही. हे उलट मुंबईची बदनामी करत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले
मला घराणेशाही मान्य आहे. कोरोन काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी हे काम केलंय. त्यामुळे मी राज्याचा कुटुंब प्रमुख झालो. ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही, त्यांच्या हातात देश दिला तर त्याचा जर्मन देशाप्रमाणे होतो’.
‘नरेंद्र मोदी आल्यानंतर स्थैर्य येईल वाटलं होतं. पण आता काय चाललं आपण पाहताय. कोणाचेही प्रश्न सुटले नाहीत. उद्या सरकार आपलं येणार, आणणार म्हणजे आणणारच. त्रास देत थांबवलं नाही तर आमचं सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटं टांगणार’, असे ठाकरे म्हणाले
‘
.ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सुरु आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.
‘काही जणांना हनुमान चालीसाचा पेव फुटलं होतं. आता मणिपूरमध्ये जाऊन बोला. लोक सांगतात, जनतेत तुमच्या बाबतीत प्रेम आहे. ते प्रेम राज्याच्या हितासाठी सांभाळून ठेवा. सरकार आल्या-आल्या मेट्रो आणि बुलेट ट्रेनची जागा सांभाळली. ती लगेच देऊन टाकली, असे ठाकरे पुढे म्हणाले. ‘बुलेट ट्रेन गद्दारांना सुरतला नेण्यासाठी सुरु करत आहेत. मुंबई तोडून दिल्लीच्या दरवाज्यात उभी करण्याचा डाव आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न झाला तर तुमचं सरकार जाळून टाकेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.