ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर याचं निधन…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे आज (गुरुवारी) नेरुळ येथे निधन झाले. त्यामुळे वारकरी व कीर्तनकार सांप्रादायात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे यांनी देखील बाबा महाराज सातारकर यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाकूडन पुणे यांनी जाहीर केलेल्या पत्रकात या आठवणी सांगितल्या आहेत, 1997-98 यावर्षी जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशकोत्तर सुवर्ण महोत्सव या उत्सवात बाबा महाराज सातारकर यांनी किर्तन सेवा केली होती.

तसेच आकुर्डी येथे 1998 ते 2003 या काळात विद्यार्थ्यांकरीता मे महिन्यात 25 दिवसांचे मुक्कामी संस्कार शिबिर घेतले जात होते. त्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी ते सदिच्छा भेट द्यायचे.याबरोबरच नवनाथ मित्र मंडळ आकुर्डी वतीने बाबा महाराज (Pune) सातारकर यांना 2002 स्व.डॉ. रामचंद्र देखणे य़ांच्या हस्ते वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

याबरोबरच ज्येष्ठ वारकरी संघ आकुर्डी यांची देखी बाबामहाराज सातारकर यांनी सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन जयंत उर्फ आप्पा बागल यांनी करत असत.

वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांच्या गोड अविट आठवणी सदैव अजरामर राहतील अशी आदरांजली महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून वाहण्यात आली आहे.

Latest News