सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ऊस मोळीचा कार्यक्रम हा नियोजित आहे. त्यामुळे कोणतेही आंदोलन करताना सामंजस्याची भूमिका घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, समाजाने आजवर शांततेचा आदर्श संपूर्ण राज्याला घालून दिलेला आहे, तोच आदर्श मोळीच्या कार्यक्रमाला दिसावा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातूनच अजित पवार  यांनी मंगळवारी (ता. ३१) माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये, अशी आक्रमक भूमिका समाजाने बैठकीत घेतली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक रंजन तावरे, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, तानाजी कोकरे, संजय काटे, बन्सीलाल आटोळे, सुरेश खलाटे, मंगेश जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशांत सातव, कार्यकारी संचालक अशोक पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक किरण अवचार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यातून सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये, या उद्देशाने कारखाना प्रशासन, मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिस प्रशासनाने आयोजित केलेली बैठक फिसकटली.दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नाही. कारखान्याचे संचालक अथवा सभासदांनी मोळी पूजन करावे, पण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला कार्यक्रमाला बोलाऊ नये, असे पत्रक या वेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आले.
दरम्यान, सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर माळेगाव कारखान्याचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कार्यक्रमात पुन्हा गोंधळ होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष झाले आहे

Latest News