दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ ला पुण्यात प्रारंभ

‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ ला पुण्यात प्रारंभ

* पुणे :काश्मीर मधील कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली तसेच सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या ‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ या प्रदर्शनाला १५ डिसेंबर रोजी काँग्रेस भवन(शिवाजीनगर) येथे प्रारंभ झाला.२१ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहील.

खास हिवाळ्यासाठी वूलनचे उबदार कपडे,शाली,स्टोल,पश्मीना प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.सिल्क साड्या,चंदेरी फॅब्रिक,मुगा सिल्क,कोसा सिल्क,कलमकारी साड्या,बनारसी सिल्क साड्या,कुर्ती,बेड शिट,कार्पेट तसेच अक्रोड,बदाम सारखा सुका मेवाही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे

.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.काँग्रेस नेते अरविंद शिंदे,संगीता तिवारी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन काश्मीरच्या कारागिरांना शुभेच्छा दिल्या. –

Latest News