‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाचा सोमवारी प्रकाशन समारंभ

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी, पुणे (दि. १९ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड शहराचे अभ्यासक श्रीकांत चौगुले लिखित ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ सोमवारी (दि. २५) चिंचवड, समरसता गुरुकुलम येथे दुपारी चार वाजता, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार आणि प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्या उपस्थितीत, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांना उपयोग झाला आहे. जिज्ञासू वाचकांच्या मागणीमुळे द्वितीय आवृत्तीत तीनशे पंचवीस पृष्ठांसह गेल्या दोन दशकात अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आणि आकर्षक मांडणीचे रंगीत कव्हर करण्यात आले आहे. नितीन हिरवे हे या आवृत्तीचे प्रकाशक आहेत. प्रकाशनाच्या निमित्ताने सवलत देण्यात येणार आहे.

या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन २००३ प्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. श्री श्री घारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

Latest News