मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाची चौकशी होणार…..


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
मावळ तालुक्यात नद्या,धरणे असुन देखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.आमदार सुनिल शेळके यांनी महिला-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन तब्बल 114 पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणल्या,परंतु त्यातील अनेक योजनांचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे स्पष्ट दिसत असून अनेक योजनांची मुदत देखील संपली आहे.
या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने आमदार शेळके आक्रमक झाले असून दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.पाणी योजनांच्या कामाची मुदत संपली असून ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी ? केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
तालुक्यातील 114 पैकी फक्त 27 योजनांचे काम पूर्ण झाले असून सुमारे 87 योजनांचे काम मुदत संपूनही अत्यंत धिम्या गतीने सुरु असून काही ठिकाणी तर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
मावळ तालुक्यात जल जीवन मिशन योजनेंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम व त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार सुनिल शेळके यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी (दि. 15) लक्षवेधी उपस्थित केली होती
. योजनांच्या निकृष्ट कामाचे फोटो दाखवून सद्यस्थिती मांडली होती. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजना निहाय माहिती दिल्यास त्याची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते.आमदार सुनिल शेळके यांनी बुधवारी (दि. 20) मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे पाणी योजनांची सद्यस्थिती दिली आहे.
त्यामुळे मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे यामधील दोषींवर कडक कारवाईचे संकेत आहेत.त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी हा सवाल उपस्थित होत आहे.
यावर अधिकारी आणि ठेकेदार कुठल्याही प्रकारची जबाबदारी न घेता टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. आमदार शेळके यांनी याबाबत 11 डिसेंबर रोजी मुद्दा उपस्थित करुन थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली होती व त्यानंतर लक्षवेधी उपस्थित करुन यावर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार याबाबत जाब विचारला होता.