श्री. शिवाजी विदयामंदीर व कनिष्ठ महाविदयालय, औंध माजी विदयार्थी मेळावा संपन्न

श्री. शिवाजी विदयामंदीर व कनिष्ठ महाविदयालय, औंध पुणे. सन १९९२ इयत्ता १० वी, उत्तीर्ण होडुन शाळेतुन आपले पुढील भविष्य घडविण्याठी बाहेर पडलो. पण आपण सर्वजन मित्र मैत्रिनी एकत्र कधी आलोच नाही. आता तो क्षण पुन्हा अनुभवण्याठी आपण तब्बल ३१ वर्षोच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्नेह संमेलन करुन पुन्हा एकदा तो शाळेतील वर्ग भरुन क्षण अनुभवले.

सन.१९९२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्याचास्नेहमेळावा औंध येथील द व्हाइट हाउस, हॉटेल औध बाणेर रोड पुणे तसेच शाळेत घेवुन ३१ वर्षो नंतर हे सर्व वर्गमित्र एकत्र आले होते.

प्रत्येकाचे आगमन व प्रत्येकास फेटा बांधणे त्यांनतर प्रार्थना सरस्वती वंदना या कुंदेदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रांता…. ही प्रार्थना झाल्यानंतर आपल्यातील काही मयत झालेल्या मित्र मैत्रिणला भावपुर्ण श्रध्दांजली वाहली

त्यांनतर प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यामध्ये काही मित्र मैत्रिनी या पोलीस अधिकारी, नगरसेवक, अभियंता, वकील, बांधकाम व्यवसायिक, मोठे उदयोजक, प्राध्यापक, पैशाचे नियोजन अधिकारी, शासकीय सेवक तर काही खाजगी श्रेत्रात नोकरी, तर त्यातील एकतर विदयालयचा संस्थापक झालेले कळाले

. मराठी माध्यमातील इतके पुढे गेलेले विदयार्थी या शाळेने तयार केलेले दिसले त्यांनतर सर्वानी एकत्रित भोजनाचा स्वाद घेवुन तसेच शाळेमध्ये जावुन देखील तेथील प्राध्यापक व स्टाफचे सम्मान करुन शाळेला भेटवस्तु देखील देण्यात तसेच प्रत्येक मित्र मैत्रिनीला एक सम्मानचिन्ह देखील देण्यात आले आहे.

त्यांनतर वर्गातच राष्ट्रगित जन गण मन…. म्हणुन स्नेहसंमलेनाचा शेवट करण्यात आला असे.या सर्वाला एकत्रित आणण्याचे काम हे प्रमुखता श्री. किरण लांडगे, समिर जुनवणे, संतोष कोतवाल, अजय सायकर, संदीप होळकर, नवीन पुनावळे व अर्चना नागवडे, सध्या पोकळे, व सुनिला पासलकर यांनी केलेला आहे.

Latest News