प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वसतिगृहाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गौरव सोहळ्याचे आयोजन….


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
– जवळगा या मराठवाडातील ग्रामीण भागातून नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणान्या प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साधून संस्थेच्या डेक्कन जिमखाना येथील वसतिगृहाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्यास झी-२४ तासचे एडीटर श्री. रामराजे शिवे, सी.बी.आय. चे वकील श्री. अभय अरीकर, वजना चे संचालक श्री. सतिश पाटील, चार्टर्ड अकीटंट श्री. संजय सुर्यवंशी, श्री. रामेश्वर मुंडे, श्री. अनमोल शिंदे, श्री. शिवाजी केंगरे, श्री. शिवानंद नलावडे, श्री. सुनिल गिरवलकर, श्री. प्रविण गव्हाणे, मुंबई उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ श्री. अविनाश कामखेडकर, पुण्यातील श्री. रणजित पाटील, अॅड.विलास राऊत,अॅड किशोर भोसले, सी.ए. व सी.एस. अभ्यासक्रमास मार्गदर्शन करणारे श्री. गोविंव जाधव, प्राध्यापक नारायण राजूरवार, एम.एम.सी. चे प्राध्यापक डॉ. एम. आर. गायकवाड यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.
अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमास मराठवाड्यातून अनेक सरपंच, नामांकित वकील, प्राध्यापक वर्ग, उद्योजक इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी प्रा. तेज निवळीकर यांनी जीवनाच्या तत्वाज्ञानात जाधव सरांचा यशस्वी प्रवास उदाहरणासह पटवून दिला.
वसतिगृहाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराल उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रा. भाऊसाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व संस्थेचा नावलौकीक वाढविल्याबद्दल अभिनंदन केले.
तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करताना तुमच्या पदाचा, अधिकाराचा वापर हा गोरगरीब, हुशार, गरजू विद्यार्थ्यांना शक्य ती तेवढी मदत करुन सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे, जेणेकरुन समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे असा मौलिक सल्लाही दिला.
कार्यक्रमास अमेरिकेतील प्राध्यापक विलास शिंदे, नांदेडचे न्यायाधिश श्री. अच्युत कराड, मुंबईतून आय.पी.एस. श्री. प्रसाद अक्कानवरु, देवणी पंचायत समितीचे उपसभापती व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. अजीत बेळकुणे, लातूर महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. दिपक मठपती, बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. किरण किटेकर, संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधीज्ञ श्री. अजिंक्य रेड़ी, श्री. ऋषिकेश ठोंबरे, दुबई स्थित वैमानिक श्री. संकेत चेडे, नांदेड जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप देशमुख, सरकारी वकील श्री. अजय काळदाते, मराठी सिनेमा कलाकार श्री. रोहित कोकाटे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मनोगताच्या माध्यमातून जाधव सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अडचणीच्या काळात वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, संस्थेच्या व वैयक्तिक माध्यमातून फी माफी, पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन, आयुष्यात यशस्वी दिशा इ. मार्गाने मदत करुन आज केवळ सरांच्यांमुळे आम्ही जीवनात यशस्वी झालो आहोत अश्या सद्गतीत भावना व्यक्त या सर्वांनी व्यक्त केल्या
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठवाडा मित्र मंडळ, कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक श्री. सतिश येळकर यांनी व सूत्रसंचालन अॅड. गणेश कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड.रणजित पाटील यांनी मानले.