आत्महत्या याप्रकरणी हॉस्टेल चालकाची रवानगी थेट येरवडा कारागृहात….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी हॉस्टेल चालकाची रवानगी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.हॉस्टेल चालक सुनील परमेश्वर महानोर (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. शेरेवाडी, पो. लोणी, रा. शिरूर कासार, जि. बीड) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अभिलाषा महेंद्र मित्तल (वय २७, मूळ रा. चंद्रकला निवास, नाथबाबा गल्ली, जालना) या तरुणीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी महेंद्र मांगीलाल मित्तल (वय ५१, रा. जालना) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सुनील माहानोर याने अभिलाषाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून अभिलाषाने ती राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये बेडशीटच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर खडक पोलिसांनी अभिलाषा मित्तल हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी सुनील महानोर याला अटक केली.

गुरुवारी आरोपी सुनील महानोर याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एल.एन. सोनवणे करत आहेत.

Latest News