पुणे शहराच्या जवळ आणि रेल्वेच्या तांत्रिक बाबींसाठी पुणे विभागाला सोयीचे

dound

 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागांच्या अधिकारक्षेत्रात बदल केला आहे. दौंड जंक्शन आतापर्यंत सोलापूर विभागात होते. सोलापूर विभागातून ते आता पुणे विभागात देण्यात आले आहे. दौंड हे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. दौंड जंक्शन पुणे शहराच्या जवळ आणि रेल्वेच्या तांत्रिक बाबींसाठी पुणे विभागाला सोयीचे असल्याने हा बदल करण्यात आला आहे.

विभागाने एप्रिल 2024 महिन्यात साखरेचे 52 रेक लोड केले आहेत. जे मागील महिन्यात 49.5 रेक आणि मागील वर्षी एप्रिल महिन्यात ही संख्या 17 रेक होती. विभागाने या महिन्यात 544 क्रॅक ट्रेन चालवल्या आहेत. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 375 क्रॅक ट्रेन चालवल्या गेल्या होत्या.

एप्रिल मध्ये विभागामध्ये 142 रेक लोड झाले. तर 343 रेक अनलोड करण्यात आले. तर 4 हजार 630 वॅगन लोड तर 15 हजार 721 वॅगन्स अनलोड केल्या.मागील महिन्यात पुणे विभागात पाच हजार 962 मेल/एक्स्प्रेस रेल्वे धावल्या. रेल्वे विभागाकडून उन्हाळी विशेष रेल्वे सोडल्या गेल्याने यामध्ये यावर्षी वाढ झाली आहे.

एप्रिल 2024 मध्ये उन्हाळी विशेष गाड्यांसह (131 मूळ, 131 टर्मिनेटिंग आणि 110 पासिंग) ट्रेनच्या मागणीनुसार (ट्रेन ऑन डिमांड) एकूण 372 ट्रिप चालवण्यात आल्या. मागच्या वर्षी याच कालावधीतील ट्रेन ऑन डिमांडच्या 90 ट्रिप चालवण्यात ( Pune Railway) आल्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात पुणे विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत देखील चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल महिन्यात पुणे रेल्वे विभागाने केवळ मालवाहतूकीतून 54 कोटी 91 लाख रुपयांची कमाई केली आहे. एप्रिल 2024 महिन्यात पुणे विभागाने 0.2924 मेट्रिक टन सामान लोडींग केले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 0.2339 मेट्रिक टन सामान लोडींग केले गेले होते.

Latest News