संविधानाच्या रक्षणासाठी BSP मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना विजयी करा बीएसपीचे आवाहन

IMG_20240508_163444

संविधानाच्या रक्षणासाठी बीएसपीला केंद्रात सत्ता ‌द्या: हुलगेश चलवादी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन

पिंपरी, पुणे (दि. ८ मे २०२४) मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजाराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन आज bsp च्या वतीने करण्यात आले आहे

मायावतीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन बीएसपीचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी यांनी केले.

यावेळी मावळ लोकसभेचे बीएसपीचे अधिकृत उमेदवार राजाराम पाटील, बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, मावळ लोकसभा प्रभारी सागर जगताप, मावळ लोकसभा अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी आदी उपस्थित होते.

, बीएसपीचा लढा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानाची रक्षा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पार्टीला सत्तेत आणणे गरजेचे आहे.

देशभरात शिक्षण हक्क कायदा राबवण्यासाठी भाजपा सह कॉग्रेसही अपयशी ठरलेले आहे. दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुला मुलींसह सर्वानाच उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. ओबीसी, मागासवर्गीय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. देशात बेरोजगारीचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे.

मागील दहा वर्षात बेरोजगारी मध्ये राष्ट्रीय पातळीवर ४० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही भीषण परिस्थिती संपवणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे बेरोजगारीला समूळ संपवण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायांना पूरक धोरणे आणली पाहिजेल. ग्रामीण भागात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार युवक शहराकडे येणार नाही तर त्याच्या स्थानिक ठिकाणीच त्याला रोजगार दिला पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी बीएसपी काम करेल. असे आवाहन bsp चे उमेदवार राजाराम पाटील यांनी केले आहे

Latest News