खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला का? त्याची चौकशी करण्याचा आदेश….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी पुणे न्यायालयात सुनावली झाली होती. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरमा खेडकरकडून न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र हाच जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे मनोरमा खेडकर यांचा मुक्काम आणखीन काही दिवस येरवडा जेलमध्येच राहणार आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नॉनक्रिमिलेअर गटातून आयएएस झाल्या. परंतु खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला का? त्याची चौकशी करण्याचा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सीआयडीला पत्र दिले आहे. परंतु पूजा खेडकर प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असल्यामुळे पुणे पोलिसांना सीआयडीने हे प्रकरण दिले आहे.पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर खरंच वेगवेगळे राहत होते का? केवळ मुलीला आयएएस करायचे म्हणून त्यांनी घटस्फोट दाखवला, हे आता चौकशीतून समोर येणार आहे. पूजा खेडकर यांचे वडील शासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त होते. परंतु कमी उत्पन्न दाखवण्यासाठी घटस्फोट दाखवल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर अहवालही केंद्र शासनाने मागविला असल्याने खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणी कमी होणार नाही. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवून त्यांनी नॉनक्रिमिलेअर गटातून आयएसएस मिळवले. यासंदर्भातील त्यांचा प्रकार समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढणार आहे. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे चौकशीला बोलवले आहे. मसूरीमधील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांचे प्रशिक्षण थांबवले आहे. पूजा खेडकर यांना 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Latest News