आगामी विधानसभा निवडणुकित लोकांना बदल हवा असल्याचं वातावरण दिसतंय- शरद पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- लोकसभेत दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. एक म्हणजे भाजपाच्या काही लोकांनी ४०० जागा पाहिजे असं सांगितलं. का तर संविधानात बदल करायचा आहे. हेगडे नावाच्या भाजपाच्या मंत्र्याने संविधान बदलायचं आहे असं सांगितलं होतं.

त्यांनीच नव्हे तर मोदींनीही अशीच भूमिका मांडली होती. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे

, त्यामुळे एकजुटीने मतदान केलं पाहिजे, असा विचार लोकांनी केला. त्यामुळे ४०० वरून चित्र खाली आलं. आता विधानसभेच्या निवडणुका आहे. त्या तीन एक राज्याच्या निवडणुका आहेत. लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे”, असं शरद पवार म्हणाले

.ते पुढे म्हणाले, “आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. पण आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे, असं लोकांना वाटतं. लोकसभेला आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत.

त्याला मूर्त स्वरुप आलं पाहिजे. मूर्त स्वरुप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आलं तर आजच्या राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल. पण लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेतील चुका विधानसभेत टाळण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत.

महायुतीकडून विविध घोषणांचा पाऊस होत असून महाविकास आघाडी सरकारवर टीका करून त्यांच्या योजनांवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप कसं होणार? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत आज महत्त्वाची माहिती दिली

“हेही सुचवलं आहे की तीन पक्ष महत्त्वाचे आहेत, तसेच डावे पक्षही महत्त्वाचे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत एकही जागा राज्यात न मागता आम्हाला सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही घ्यावी आणि डावे पक्षांना काही जागा द्यावात, अशी चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय घेतला जाईल”, अशीही योजना त्यांनी आज बोलून दाखवली.

Latest News