माजी खासदार काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न…..

आता सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली

प्रसिद्ध उद्योजिका आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक उषा काकडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. महिला आणि बालकांसाठी काम करण्यासाठी ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे काम करतात. बाललैंगिक शोषणाविरोधात देखील त्या काम करत होत्या.

राजकीय पार्श्वभूमी असूनही काकडे यांनी स्वतःची वेगळी वाट निवडून त्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी या पलीकडची ओळख त्यांनी सामाजिक कार्याच्या परिघात निर्माण केली आहे.

दरम्यान, उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले. त्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी 3.30 ते 4 च्या सुमारास त्रास जाणवू लागला. उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे

उषा यांनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कौटुंबिक कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, रुबी हॉस्पिटलने अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. रुबी हॉल हॉस्पिटलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबत माहिती दिली.

Latest News