दादा तुमच्या आमदारानं राज्य नासवलं -वैभवी देशमुख

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

वैभवी म्हणाली, माझ्या वडिलांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत झालेली गर्दी पाहून मी भावूक झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित दादांना माझी विनंती आहे की, तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत, त्यांच्यामुळे राज्य नासत चाललं आहे. त्यांना तुम्ही पाठीशी घालू नका. त्या आमदाराच्या चुकीच्या गोष्टीमुळे आमच्यासारख्या सामान्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. माझ्या वडिलांचं जे प्रकरण घडलं आहे, अशी अनेक प्रकरण घडली आहेत. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजित दादा ते खऱ्याचं खरं करतात, आणि खोट्याचं खोटं करतात, हे मी ऐकलं असून, पाहिलंही आहे. त्यामुळे अजितदादांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांना मारण्यात आले, ती खंडणी कोणाकडे जाणार होती, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. माझ्या वडिलांची हत्या होऊन तीन महिने झाले, त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे,अजित दादा तुमच्या आमदारानं राज्य नासवलं, त्या आमदाराला पाठीशी घालू नका, असे आवाहन मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पत्रकारांशी बोलताना केले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती मध्ये सर्व धर्मीय मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय बारामतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना वैभवी देशमुख हिने आपली कैफियत मांडली

Latest News