कोथरूड भागात 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याकडून लंपास….


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूड भागातील परांजपे शाळेजवळ असलेल्या ऋतुरंग सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्यचाा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेतसदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.