समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लवकरच जनजागृतीसाठी ‘‘डमी बिल’’ संकल्पना


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त अभियंता, प्रसन्नराघव जोशी (Prasannarav Joshi) यांनी या योजनेमागे असलेला उद्देश स्पष्ट केला. “नागरिकांना आपण किती पाणी वापरतो हे समजावे आणि मीटरनुसार येणाऱ्या बिलाची सवय व्हावी, या हेतूने हे डमी बिल पाठवले जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक ऑनलाइन प्रणालीदेखील विकसित करण्यात आली आहे. या माहितीपूर्ण बिलांमुळे नागरिक पाणी जपून वापरतील आणि पर्यायाने पाण्याची बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे
यातून पाणी वापराबाबत जनजागृती साधली जाईल,” असे त्यांनी सांगितलेया डमी बिलाची रक्कम नागरिकांना प्रत्यक्षात भरावी लागणार नाही.
हे बिल केवळ माहितीसाठी असेल, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या पाणी वापराच्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू केली जाईलपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लवकरच नागरिकांना ‘डमी पाणी बिल’ पाठवण्याचा प्रस्ताव आहे.
प्रत्यक्ष बिल आकारणी सुरू करण्यापूर्वी, नागरिकांना त्यांच्या पाणीवापराची आणि मीटरप्रमाणे येणाऱ्या बिलाची माहिती व्हावी, या उद्देशाने ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव सध्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.या योजनेद्वारे शहरात निवासी आणि व्यावसायिक अशा एकूण सुमारे १ लाख ६० हजार नवीन पाणी जोडण्या दिल्या जाणार असून, तिथे मीटर बसवले जात आहेत.
.समान पाणीपुरवठा (Pune News) योजनेअंतर्गत शहरात नवीन मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या भागात ९० टक्क्यांहून अधिक मीटर बसवून पूर्ण झाले आहेत, अशा भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही डमी बिले पाठवण्यास सुरुवात केली जाईल. यामुळे नागरिकांना मीटरद्वारे नोंदवल्या जाणाऱ्या वापराची अचूक माहिती मिळेल