कष्टकऱ्यांच्या घामाचा अपमान आणि निष्ठेची फसवणूक; ज्या हातांनी सत्ता दिली, तेच हात आता सत्तेचा माज उतरवतील…

kambale

– डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा आर्त टाहो. “आम्ही राबलो, आम्ही लढलो आणि आम्हालाच नाकारले? अजितदादांच्या दारी कष्टकरी माता-भगिनींचा अपमान; महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांत ‘घड्याळाची’ टिकटिक थांबवणार! “पुरोगामी महाराष्ट्रात कष्टकऱ्यांच्या पाठीत खंजीर! विधानसभेला त्याग केला, पण महापालिकेला आमचाच हक्क नाकारला; डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती प्रहार.”

पिंपरी चिंचवड, २३ डिसेंबर २०२५ (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्रातील तमाम असंघटित कामगार, कष्टकरी आणि शोषितांच्या न्यायासाठी आयुष्य वेचणारे कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फसव्या राजकारणाचा अत्यंत उद्विग्न मनाने आणि हृदयस्पर्शी शब्दांत जाहीर निषेध केला आहे. ज्या कष्टकरी जनतेने २००७ पासून राष्ट्रवादी काँग्रेसला रक्ताचे पाणी करून साथ दिली, त्याच जनतेच्या आणि महिलांच्या अस्मितेचा अपमान झाल्याची खंत डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

​निष्ठेचा अंत आणि सत्तेचा अहंकार

डॉ. बाबासाहेब कांबळे अत्यंत भावूक होऊन म्हणाले की, “आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. २००७ पासून निष्ठावान राहून मी आणि माझ्या संघटनेने अजित पवार यांना प्रत्येक निवडणुकीत साथ दिली. २०२४ च्या विधानसभेला पिंपरी मतदारसंघात निवडणूक लढण्याचा माझा हक्क असतानाही केवळ पक्षाच्या सांगण्यावरून मी उमेदवारी मागे घेतली. आकुर्डीच्या सभेत अजितदादा पवार यांनी मला स्वतःची खुर्ची भजनात दिली माझ्या सन्मानाचे आणि महामंडळाच्या पदाचे आश्वासन दिले होते. पण आज सत्तेच्या अहंकारात या कष्टकऱ्यांच्या त्यागाचा विसर पडला आहे.”

​प्रभाग ९ मधील अनपेक्षित फसवणूक खराळवाडी, गांधीनगर, विठ्ठल नगर, नेहरूनगर या भागातील जनतेच्या आग्रहाखातर डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी मागितली होती. पक्षाने सुरुवातीला होकार दिला, पण ऐनवेळी आमदारपुत्राच्या हट्टापायी एका कष्टकऱ्यांच्या नेत्याचा बळी देण्यात आला. “ही फसवणूक केवळ माझी नाही, तर महाराष्ट्रातील ३ कोटी असंघटित कामगारांच्या विश्वासाचा घात आहे,” असा आरोप डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी केला.
​महिलांचा अपमान: काळजाला लागलेली जखम
आज दुपारी अजित पवार यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या प्रसंगाने कष्टकऱ्यांचे काळीज पिळवटून निघाले आहे. डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले की, “आज भेटीसाठी गेलेल्या कष्टकरी माता-भगिनींनी जेव्हा महापालिकेत आपल्या हक्काच्या प्रतिनिधीची मागणी केली, तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. घरातली भांडी घासणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या माझ्या कष्टकरी मातांचा झालेला हा अपमान मी कधीही विसरणार नाही. जो पक्ष गरिबांच्या महिलांचा आदर करू शकत नाही, तो जनतेचे कल्याण काय करणार?”

​महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांत उत्तर मिळणार!

पिंपरी चिंचवडमधील ७ ते ८ लाख कष्टकरी हीच खरी ताकद आहे. रिक्षा-टॅक्सी चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, घरकामगार महिला आणि हमाल आता शांत बसणार नाहीत. “आम्ही सत्तेच्या विरोधात आता मतपेटीतून क्रांती घडवू. लवकरच पिंपरी येथे

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महासभा बोलावून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला कायमची चपराक देणारा ऐतिहासिक निर्णय घेऊ,” असा इशारा डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी दिला आहे.
​याप्रकरणी कायदेशीर पावले उचलण्यासोबतच निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

Latest News