आमदार महेश लांडगे आणि माजी नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांच्यामुळे नवीन न्यायालय – ॲड. मंगेश खराबे

ps

भोसरी गावठाणातून भाजपचे पूर्ण पॅनल विजय करण्याचा मतदारांचा निश्चय

पिंपरी, पुणे (दि. १२ जानेवारी २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ मार्च १९८९ रोजी दोन न्यायालय सुरू झाले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढत गेली. परिणामी न्यायालयावरील कामाचा ताण वाढत गेला आणि पक्षकार व वकिलांना पर्याय म्हणून पुण्यात जावे लागत होते. पिंपरी मध्ये न्यायालयांची संख्या वाढावी आणि नवीन इमारत मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड वकील संघटना अनेक वर्ष पाठपुरावा करीत होते. त्याला आमदार महेश दादा लांडगे आणि तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या माध्यमातून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये नवीन ११ न्यायालय सुरू करण्यासाठी वेग आला व नवीन प्रशस्त जागेत न्यायालय सुरू झाले. त्यामुळे लाखो पक्षकार आणि वकिलांना उपयोग झाला आहे. समाजासाठी उपयोगी ठरणारे निर्णय तत्पर घेणारे आमदार महेश लांडगे आणि ॲड. नितीन लांडगे यांचे धन्यवाद मानले पाहिजेत असे महेश दादा लांडगे विधी व न्याय फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ॲड. मंगेश खराबे यांनी सांगितले.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरी येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी रोडशो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. यानंतर माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना ॲड. मंगेश खराबे बोलत होते. रविवारी, प्रभाग क्रमांक ७, भाजपाचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांनी विकास कॉलनी सँडविच कॉलनी राधानगरी या परिसरात मतदारांशी संपर्क साधला. यावेळी विजय फुगे, बाबू खराबी, किसन बबन लांडगे, विजय बबन लांडगे, काळूराम पवळे, दत्तात्रय पांडुरंग फुगे, बाजीराव शंकर लांडगे, बाळासाहेब आनंदा लांडगे, राजाराम नथू लोंढे, श्रीकांत लांडगे, सागर डोळस, रमेश पठारे, संजय पठारे, सूरदास फुगे, कालिदास परशुराम लांडगे, बाजीराव शंकर लांडगे, बंडोपंत जगन्नाथ लांडगे, मनोज जगताप, संजय लक्ष्मण पठारे, अनिल ज्ञानेश्वर लोंढे, वैभव पोळ, चंद्रकांत नथू लोंढे, पै. तुळशीराम लोंढे, अंकुश लोंढे, अनिल लोंढे, संतोष फुगे, सागर लोंढे, किरण लांडगे, अशोक लांडे, संदीप गवारे, हिरामण लांडगे, सागर डोळस, किसन लांडगे, जीवन फुगे, राजू लोंढे, सूरदास फुगे, संदीप झंझाड, पंकज गव्हाणे, राजु राक्षे, दादू डोळस, संदीप राक्षे, हभप सुदाम माने, दत्ताभाऊ गव्हाणे, माऊली भोपते, दिलीप तांबे, राहुल लांडगे, रोहिदास खोंडे, राहुल चंद्रकांत लांडगे, बाळू गायकवाड, निवृत्ती बजाबा लांडगे, निलेश लांडगे, ॲड. अमर लांडगे, किरण शिवाजी लांडगे, बाजीराव परशुराम लांडगे, श्रीकांत लांडगे, चंद्रकांत विठ्ठल लांडगे, योगेश चंद्रकांत लांडगे दत्तात्रेय पांडुरंग फुगे, विजय बबन लांडगे, काळुराम पवळे आदी उपस्थित होते.

Latest News