भाजपाचा विकास सापडत नाही – आमदार भास्कर जाधव

प्रभाग क्रमांक २५ मध्ये चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांना निवडून द्या – खासदार ओमराजे निंबाळकर
पिंपरी, पुणे (दि. १२ जानेवारी २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) भाजपा प्रत्येक निवडणुकीत विकासाचा दावा करते, भ्रष्टाचाराच्या आड लपलेला त्यांचा विकास पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना अध्यापही सापडत नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराची कबुली त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीरपणे देतात. आता ताथवडे, पुनावळे, वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील सुजाण नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार आणि सागर विजय ओव्हाळ यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्याचा निश्चय केला आहे असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. रविवारी (दि.११ ) ताथवडे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक २५ चे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार (ड), सागर विजय ओव्हाळ (अ) यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत आमदार भास्कर जाधव बोलत होते.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, चेतन पवार हा सर्व नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध होणारा युवा कार्यकर्ता आहे. हाच खरा भगव्या झेंड्याचा कट्टर समर्थक आहे. ताथवडे पुनावळे गावच्या सुपुत्राला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळालेली ही संधी आहे. या परिसराचा खरोखरच विकास व्हावा, यासाठी सुज्ञ मतदारांनी चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांना निवडून द्यावे असे आवाहन खासदार निंबाळकर यांनी केले. यावेळी प्रभाग क्रमांक २५ ताथवडे, पुनावळे व वाकड या प्रभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चेतन महादेव पवार, सागर विजय ओव्हाळ यांच्यासह शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, जिल्हाप्रमुख आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, जिल्हा उपप्रमुख रोमी संधू, हाजी मणियार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव पवार, तानाजी विनोदे, रामदास पवार, अविनाश पवार, संजय पवार, पांडुरंग शिंदे, किसन गराडे, राकेश पवार, बाळासाहेब पवार, धनंजय पवार, किरण पवार, विजय दगडे, रोहन वाघेरे, सुमित निकाळजे, गणेश विनोदे, संतोष कदम, बाळासाहेब ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, कमलेश ओव्हाळ, राहुल पवार, राजू पवार, स्वप्निल पवार, कृष्णा पवार, योगेश पवार, संकेत पवार, अक्षय भोसले, रोहिदास पवार, संभाजी पवार, शहाजी पवार, वसंतराव केलवड, शांताराम सपकाळ, चंद्रकांत पवार, तुकाराम पवार, सचिन पवार, किसन महाराज सपकाळ तसेच ताथवडे, पुनावळे व वाकड गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
