ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल…

पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. जानेवारी महिन्यात आरटीओच्या तपासणीत १७४ रिक्षा दोषी आढळले आहेत. यामध्ये जादा भाडे आकारलेले २९, मिटर फास्ट १०,जादा प्रवाशी १, भाडे नाकारणे १०, उध्दट वर्तन १७, व इतर अशा एकून १७४ ऑटोरिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून ऑटो रिक्षाचालकांना दणका देण्यात आला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ४,८९६ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.यात १,८७७ दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून १०५ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक करवाई करून ८ लाख ६७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंञण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या नऊ महिन्यात आरटीओच्या तपासणीत १,८७७ रिक्षा दोषी आढळले आहेत.यामध्ये जादा भाडे आकारलेले ८७, मिटर फास्ट ४६,जादा प्रवाशी २९,भाडे नाकारणे ११९,उध्दट वर्तन ८६, व इतर अशा एकून १,८७७ ऑटोरिक्षावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता थेट मनमानी पध्दतीने भाडे घेत आहेत.तसेच जादा प्रवाशी, भाडे नाकारणे,उद्धट वर्तन,मीटर फास्ट अशा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे rto कडून बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.जानेवारी २०२६ मध्ये ४७७ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली यात १७४ ऑटो दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत pune rto आरटीओ प्रशासनाकडून ६ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक कारवाई करून ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. कोणत्याही ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे, मिटर फास्ट असणे, उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे, प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल, स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
