पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे दिवाळी फराळ उत्साहात साजरा !

1564449

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे दिवाळी फराळ उत्साहात साजरा !

पिंपरी/ प्रतिनिधी/ पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने गेली १५ वर्ष दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येतेयावर्षीही काल बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६रोजी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले

.समाजातील विविध घटकांबरोबर पत्रकारांचे सलोख्याचे व स्नेहाचे ऋणानुबंध रहावेत या उदात्त हेतूने दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तिंबरोबर दिवाळी फराळ साजरा करण्याची परंपरा पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविली जाते.

यापूर्वी महापालिकेचे साफसफाई कर्मचारी, शिपाई, सुरक्षा रक्षक असा विविध विभागातील कर्मचाऱ्याबरोबर दिवाळी फराळाचे आयोजन केले होते.यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवीभाऊ लांडगे, महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे,संदीप खोत, ज्येष्ठ नगरसेवक अनंत कोऱ्हाळे,शहर अभियंता मनोज सेठीया, नगर सचिव उल्हास जगताप,कार्यकारी अभियंता सुनील पवार, हेमंत देसाई कार्यकारी अभियंता भोजने, काशीद,लक्ष्मीकांत कोल्हे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब लांडे, बोरसे, शशिकांत मोरे,सोहम निकम कार्यकारी अभियंता डी डी पाटील ,,सूर्यकांत मोहिते,सह शहर अभियंता बापू गायकवाड, विनय ओव्हाळ,, भालसाखळे, सिनकर, संध्या वाघ, लेखापाल उबाळे,प्रमोद भोसले, इत्यादी मान्यवर व शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत दिवाळी फराळाचा सर्वांनी आनंद घेतला. यावेळी सर्वांचे स्वागत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे,विनय लोंढे,रेहान सय्यद, सचिव संतोष जराड,सह सचिव मुकेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख युनूस खतीब, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी , अशोक लोखंडे, अमोल डंबाळे, सबनम सय्यद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Latest News