चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

ps logo rgb

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ.आरती सूर्यवंशी यांनी साजरा केला आनंदाचा सण; फराळासोबत शिक्षणासाठी टॅबची अनमोल भेट

पिंपरी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी म्हणजे आनंदाची देवाणघेवाण, प्रेमाची उधळण आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचा सण! याच सणाचा खरा आनंद समाजातील गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा संवेदनशील प्रयत्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी कार्यरत असलेल्या ‘स्नेहवन’ संस्थेतील चिमुकल्यांसोबत त्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. मुलांसोबत फराळाचा गोडवा वाटला, त्यांच्या स्वप्नांना जाणून घेतले आणि शिक्षणाच्या वाटेवर नवी भरारी घेण्यासाठी टॅबची अनमोल भेट दिली. आयुक्त दाम्पत्याच्या या प्रेमळ भेटीने स्नेहवनमधील मुलांची दिवाळी केवळ प्रकाशमयच झाली नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि आत्मविश्वासाचे नवे हास्यही फुलले.

आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा येथे स्नेहवन नावाची संस्था अशोक देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने हे चालवतात. या संस्थेत जात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी डॉ.आरती सूर्यवंशी यांनी दिवाळी सण साजरा केला. स्नेहवनमधील मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि शिकण्याची जिद्द अनुभवताना आयुक्त दाम्पत्यही भारावून गेले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संस्थेच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची नवी दालने खुली व्हावीत, यासाठी आयुक्तांनी मुलांना टॅब भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ एक उपकरण नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा होती.

आत्मविश्वास कधीही हरवू देऊ नका; शिक्षण घेणे थांबवू नका!

या भेटीतील सर्वांत भावस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ.आरती सूर्यवंशी आणि मुलांमधील मनमोकळा संवाद. मुलांनी आयुक्तांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी, सरकारी अधिकारी होण्यासाठी केलेला संघर्ष, महापालिकेचे कामकाज आणि गरजू नागरिकांची कामे कशा पद्धतीने मार्गी लावली जातात, असे अनेक प्रश्न विचारले.

मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला आयुक्तांनी अत्यंत आपुलकीने उत्तरे दिली. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी विट्टी-दांडू, सुरपारंब्यासारख्या खेळांचा उल्लेख केला. आर्मी ऑफिसर म्हणून झालेली निवड, त्यानंतर कस्टम अधिकारी, सहकार विभागातील काम, कोल्हापूर आणि रायगड येथील प्रशासकीय जबाबदाऱ्या, जिल्हाधिकारी आणि पुढे महानगरपालिका आयुक्त म्हणून केलेला प्रवास त्यांनी मुलांसमोर उलगडला. ते म्हणाले, शिक्षण घेताना अडचणी येऊ शकतात; मात्र आपला आत्मविश्वास कमी पडता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेणे थांबवू नका. रोज काहीतरी नवीन शिका, नियमित अभ्यास करा आणि वाचनाची सवय लावा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जिद्द आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

सरकारी सेवेतील आपल्या अनुभवातून त्यांनी मुलांना एक मोलाचा संदेशही दिला. आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे. गरजू लोकांची मदत करणे, त्यांची कामे मार्गी लावणे, हा प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचा विचार असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुलांनी त्यांच्या वाचनाची आवड, त्यांनी वाचलेली पुस्तके तसेच टेस्लासारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींबाबतही उत्सुकतेने प्रश्न विचारले. मुलांच्या या जिज्ञासू वृत्तीचे आयुक्तांनी कौतुक केले. ‘मला तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. लहानपणी तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या, हेही मला जाणून घ्यायचे आहे,’ असे म्हणत त्यांनी मुलांशी संवाद अधिक जिव्हाळ्याचा केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी अत्यंत भावनिक आवाहन केले. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. कितीही कठीण काळ असला तरी शासन आपल्या पाठीशी आहे. कोणताही वाईट काळ कायम राहत नाही. धैर्याने आणि संयमाने त्याला सामोरे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हरवलेले छत्र पुन्हा मिळणार नाही; पण स्वप्नांना आकाश नक्की देत…

Latest News