पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड : पिंपरी महानगरपालिकेच्या राज्य शासनाने प्रशासकीय निर्णय घेत डॉ. विजय सूर्यवंशी यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे सामान्य प्रशासन बुधवारी (दि.११) आदेश करण्यात आला. सध्या कोकण विभागाचे विभागीय आयुक्त कार्यरत असलेले डॉ. सूर्यवंशी बदली करून त्यांची पिंपरी महानगरपालिकेच्या आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे
शासनाच्या आदेशानुसार डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडून तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नवीन पदावर रुजू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) रुजू अहवाल अद्ययावत करणे, तसेच कार्यभार हस्तांतरण व स्वीकृती करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचेही निर्देश आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
हा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केला असून संबंधित विभागांना याची प्रत पाठविण्यात आली आहे.
