विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण जनजागृतीला चालना..

1

पुणे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

अंतर्गत पृथ्वी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन IQAC, सेंटर फॉर क्लायमेट रेजिलियन्स, वॉटर इनोव्हेशन अँड ग्रीन सोल्यूशन्स, NSS युनिट आणि रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.पृथ्वी सप्ताहाची सुरुवात 22 एप्रिल रोजी शाश्वततेच्या प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर 23 एप्रिल रोजी ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता सत्र शैलेश घोडके आणि प्रियंका धूत यांनी घेतले. 24 एप्रिल रोजी रोटरॅक्ट क्लबतर्फे प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली.

26 एप्रिल रोजी NSS युनिटने पक्ष्यांसाठी फीडर बसवून जैवविविधता संवर्धनाला चालना दिली. 27 एप्रिल रोजी स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स आणि स्कूल ऑफ डिझाइन यांनी पोस्टर प्रेझेंटेशन व सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन केले, ज्यामध्ये 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजित दळवी, सुनीता पाटील, समता बेंद्रे, तसेच डॉ. प्रियंका धूत आणि डॉ. शैलेश घोडके यांनी विशेष योगदान दिले.

या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरलेला वृक्षारोपण उपक्रम 27 एप्रिल रोजी पार पडला. या वेळी कुलगुरू मनीष भल्ला, नोंदणी अधिकारी बीरन मोईदीन, अभियांत्रिकी अधिष्ठाता अनुपमा पाटील, संशोधन अधिष्ठाता रामेंद्र पांडे आणि IQAC संचालक सुनील दांभारे उपस्थित होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अभय दप्तारदार, सहाय्यक संचालक (ग्रेड I), IEDS MSME-DFO, भारत सरकार यांनी विद्यापीठाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले. तसेच पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक कृती आवश्यक असून युवकांनी शाश्वत भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DYPIU), आकुर्डी येथे 22 ते 29 एप्रिल 2026 दरम्यान ‘भारत पर्यावरण कार्यक्रम 2026 – भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन’

Latest News