केवळ चौथी शिक्षण झालेल्या व्यक्तीने बायबलचे 469 वचन न बघता लिहून वर्ल्ड रेकॉर्ड….

ps

खडकी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

काही वेळेस ईश्वराची शक्ती असल्याचे अनुभव अनेकांना होते. केवळ चौथी शिक्षण झालेल्या व्यक्तीने बायबलचे ४६९ वचन न बघता लिहून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने गोल्ड मॅडल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले. सबेस्टियन जोसेफ मरियन यांनी १ तास २१ मिनिटं सलग बसून न बघता बायबलचे वचन लिहिल्याने त्यांचे नाव ओएमजी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आले आहे.
सबेस्टियन मरियन हे ४९ वर्षे असून खडकीमध्ये राहतात. लहानपणापासून त्यांना धार्मिक आवड आहे, त्यांचे शिक्षण केवळ चौथी पर्यंत झाले असून त्यांना हिंदी लिहिता येत नाही तर ते केवळ हिंदी वाचू शकतात. मात्र त्यांना असलेल्या तेज स्मरणशक्ती मुळे बायबलचे वचन त्यांना तोंडपाठ झाले होते.

सबेस्टियन यांना त्यांचा मुलगा ज्यूड याने एकदा बोलताना सांगितले की, तुम्हाला सगळेच वचन तोंडपाठ येतात तर हे वर्ल्ड रेकॉर्ड सारखे आहे. सबेस्टियन यांच्या मुलाने इंटरनेटवर ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधीनी रेकॉर्ड संदर्भात संपूर्ण माहिती दिली, त्यांनी सांगितल्या प्रमाणे संपूर्ण माहिती घेऊन सलग १तास २१ मिनिटांमध्ये बायबलचे ४६९ वचन लिहून दाखविले.
सबेस्टीयन यांना ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने प्रो. दिनेश गुप्ता यांच्या हस्ते गोल्ड मॅडल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले. भगवान प्रत्येक माणसाच्या वेगवेगळे टॅलेंट, गुण, कोशल्य देतो. केवळ चौथी शिक्षण झाले असताना देखील ४९ व्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो, तर शिक्षण आणि वयाचे बंधन नं ठेवता आपल्या मेहनती पुढे कोणतेही कार्य कमी नसून आपण उत्तुंग यश मिळवुन देशाचे नाव उंच करू शकतो असे सबेस्टियन मरियन यांनी सांगितले.

फोटो
ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने मिळालेल्या गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट सहित सबेस्टियन मरियन.

Latest News