भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व ज्युनिअर असोसिएशन तसेच महापालिका अभियंता यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय अभियंता दिन साजरा

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
दिनांक 15 सप्टेंबर रोजी भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व ज्युनिअर असोसिएशन तसेच महापालिका अभियंता यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघन काटे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मनोज सेठिया , मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कर्मचारी महासंघ अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अभियंता अध्यक्ष सुनील बेळगावकर, अभियंता, कार्याध्यक्ष चंद्रकांत कुंभार, अभियंता सचिव संतोष कुदळे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक, सर्व शहर अभियंता व संचालक मंडळ यांच्या समवेत महापालिका कर्मचारी व नागरिक यांनी त्यांना अभिवादन केले व सदर मुख्य कार्यक्रमास ग दि माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी येथे दुपारी ऑल दि बेस्ट नाटक तदनंतर आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन व अभियंता साठी दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी पूर्ण आरोग्य तपासणी करणे व अभियंता यांनी क्वालिटी मॅनेजमेंट आणि शहराचे नाव लौकिक करण्यासाठी काम करण्यास सांगितले तसेच प्रमुख वक्ते दिमाख सहस्त्रबुद्धे यांनी AI उपयोग व वापर कसा करावा याची माहिती दिली व सांगितिक कार्यक्रमाने अभियंता दिनाचा समारोप झाला.
