फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने आरटीओ ची कारवाई होणार…

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मोहिमेदरम्यान काळी फिल्म बसवलेल्या १६ वाहनांवर तीन हजार रुपये, एचएसआरपी नसलेल्या २७५ वाहनांवर कारवाई करून १ लाख ८ हजार रूपये, फॅन्सी नंबर प्लेट व चुकीच्या पद्धतीचे नोंदणी क्रमांक असणाऱ्या ५९ वाहनांवर कारवाई करून २० हजार ५०० रूपये, तर, इतर राज्यातील नोंदणीकृत असणाऱ्या ४५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून ६ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या एकूण कारवाईत ३९५ प्रकरणांमध्ये एकूण ८ लाख ९ हजार रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला, अशी माहिती पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहनमालकांनी आपल्या वाहनावरील नियमबाह्य किंवा फॅन्सी नंबर प्लेट तात्काळ काढून शासनाच्या नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. तसेच, वाहनांच्या काचांना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने काळी फिल्म लावू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करून वाहनाची मूळ रचना अथवा सुरक्षा मानकांमध्ये बदल करू नये. नंबर प्लेट शासनाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार असणे आवश्यक असून,
वाहनांवरील नियमबाह्य आकर्षक (फॅन्सी) नंबर प्लेट, काळी फिल्म, एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नसलेली वाहने तसेच, इतर राज्यात नोंदणी असलेल्या दोषी लक्झरी बसविरोधात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम राबविली. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून तब्बल ८ लाख नऊ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या विशेष मोहिमेदरम्यान आरटीओच्या पथकांकडून विविध वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांच्या काचांना नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली काळी फिल्म, आकर्षक अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, चुकीच्या पद्धतीचे नोंदणी क्रमांक तसेच, एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. याशिवाय इतर राज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी व ट्रॅव्हल्स बसचीही तपासणी करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने आणि इतर राज्यातील लक्झरी बसविरोधात धडक मोहीम उघडली आहे.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.
