पुण्यात वाढतोय कोरोना 246 रुग्ण

पुणे प्रतिनिधी: काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी तिघांचा काेरोनाने मृत्यू झाला असून पुण्यात ३४ रुग्ण, तर पिंपरी -चिंचवडमध्ये २ रुग्ण असे एकूण ३६ नवीन रुग्ण सापडले. मृत्यू झालेल्यांपैकी एक मधुमेह असलेली ६७ वर्षीय महिला भवानी पेठ येथील असून दुसरा रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ३० वर्षीय गतिमंद तरुण ॉअाहे. पाच एप्रिल राेजी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते अाणि अति ताण व शरीरातील अवयव निकामी झाल्याने शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून रुग्णालयात सर्वाधिक १९ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला अाहे. पुण्यात अातापर्यंत काेराेनाचे २०९ रुग्ण सापडले असून जिल्ह्यात ११ बाधित अाढळले अाहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २६ काेराेना रुग्ण सापडल्याने एकूण पुणे परिसरातील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या २४६ वर पाेहोचली अाहे. शुक्रवारी नायडू रुग्णालयात २० जण काेराेना पाॅझिटिव्ह सापडले असून ससून रुग्णालयात १३ काेराेनाग्रस्तांचा अहवाल पाॅझिटिव्ह अाला. याशिवाय पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात चार नवीन काेराेना रुग्ण सापडले आहेत. सध्या नायडू रुग्णालयात १२१ रुग्ण दाखल असून ससून रुग्णालयात ४४ जण उपचार घेत अाहेत. शहरातील पाेलिसांच्या गाड्यांना सॅनिटायझेशन करण्यास सुरुवात काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पुणे पाेलिस दलातील कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस गस्त घालत अाहेत. गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३०० पेक्षा अधिक पाेलिस वाहनांचे सॅनिटायझेशन करण्यासाठी बी. यू. भंडारी ग्रुपचे चंद्रवदन भंडारी यांनी पुढाकार घेतला अाहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणारे पाेलिसदेखील सुरक्षित राहावेत या भावनेतून हा उपक्रम हाती घेतल्याचे भंडारी यांनी सांगितले. पाेलिस अायुक्त के. व्यंकटेशम यांच्या वाहनाचे सॅनिटायझेशन पहिले करून या उपक्रमास सुरुवात झाली. एकाच कुटुंबातील पाच जण काेराेनामुक्त, एकूण २३ बरे पुण्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली असतानाच एका काेराेनाबाधित कुटुंबातील पाच जणांचे १४ दिवसांनंतरचे स्वॅबचे नमुने निगेटिव्ह अाल्याने संबंधित पाच जणांना रुग्णालयातून घरी साेडण्यात अाले अाहे. त्यामुळे अातापर्यंत एकूण २३ जण काेराेनामुक्त झाले असून पुण्यात अातापर्यंत काेराेनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला अाहे.