“लॉकडाऊन” वाढविण्याबाबत विचार अद्यापही नाही- कॅबिनेट सचिव राजीव गौबा

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन हे पुढे तसेच सुरु ठेवण्याचा विचार अद्याप सरकारकडून करण्यात आलेला नाही. याबाबत उगाच अफवा पसरवू नये, असे कॅबिनेट सचिन राजीव गौबा यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोविड 19 अर्थात कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता काही सध्याच्या घडीला सुरु असणारं

२१ दिवसांचं लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवणार असल्याच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला. पण, थेट केंद्राकडूनच या चर्चा नाकारण्यात आल्या. सचिन राजीव गौबा यांनी सोमवारी लॉकडाऊन वाढवणार असल्याच्या या चर्चा परतवून लावल्या. ‘ही सारी माहिती, हे अहवाल पाहून मी थक्कच होत आहे. लॉकडाऊनचा काळ वाढवण्याचा कोणचाही विचार तूर्तास नाही’, असं गौबा म्हणाले. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. हे लॉकडाऊन पुढे सहा महिने वाढवणार असल्याची चर्चा माध्यमांवर होती. मात्र आता या चर्चांना केंद्राकडून धुडकावण्यात आले आहे. असं काहीही होणार नसल्याची माहिती केंद्राने दिली आहे

Latest News