दौंड तालुक्‍यात करोनाचा ”पाचवा बळी” -डॉ. संग्राम डांगे

दौंड प्रतिनिधी : दौंड तालुक्‍यात सोमवारी (दि. 8) करोनामुळे 78 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील हा पाचवा बळी गेला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. तसेच राज्य राखीव दलातील चार जवानांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे गट क्रमांक 7 च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी सांगितले. राज्य राखीव दलातील जवानांसह 41 जणांची करोनाची तपासणीकरण्यात आली असून त्यातील 38 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 4 जवानांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीच्या सर्व जवानांनी तर एका व्यक्‍तीने करोनावर मात केली आहे. दौंड शहरामध्ये करोनामुळे पाचवा बळी गेला असल्यामुळे दौंडकरांची चिंता वाढत चालली आहे.

Latest News