शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का-शिवसेना नेते अरविंद सावंत

मुंबई : शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा कणखर प्रश्न करत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलेच खडसावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्र संवाद कार्क्रमादरम्यान शिवसेनेवर टीका केली होती.

सावंत म्हणाले, तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला आणि 70 हजार एलईडी लावून प्रचार सुरु केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये. ही राजकारणाची वेळ नसल्याचं सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं? आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असं काही नाही. सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत असल्याचे सावंत म्हणाले.

शरद पवार हे देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दौरा केला तर तुमच्या पोटात ढवळण्याची काही गरज नाही. त्याचं स्वागत केलं पाहिजे, असे सावंत यांनी भाजपाला ठणकावून सांगितले. राजकारण करायची ही वेळ नाही. देश आणि विश्व एका विषाणूने त्रस्त झाला असून त्याच्यावर मात करायची गरज आहे. तुम्ही मात्र परवा बिहारचा बिगुल वाजवला. 70 हजार एलईडी लावून तुम्ही प्रचार सुरु केला.

Latest News