शालेय अभ्यासक्रम आणि तासिकांचा वेळ कमी करण्याचा निर्णय?

नवी दिल्ली – देशातील लॉकडाउनच्या नियमांत हळूहळू शिथिलता आणली जात असली सर्व शैक्षणिक संस्था सुरू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच आगामी वर्षात शालेय अभ्यासक्रम आणि तासिकांचा वेळ कमी करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली. सद्याची स्थिती पाहता पालक आणि विद्यार्थ्यांकडून आलेल्या मागणीचा विचार करता. येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांचा वेळ कमी करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं पोखरीयाल म्हणाले. यासह पोखरियाल यांनी शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांना या संदर्भात काही पर्याय सुचवण्याचं आवाहन देखील केलं आहे.

दरम्यान, याआधी देखील पोखरियाल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत १५ ऑगस्टनंतर शाळा सुरु होतील, असे संकेत दिले होते. मात्र असं असलं तरी सर्व काही त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असं ते म्हणाले. सद्यस्थिती अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डिजिटल लर्निंगचा पर्याय अवलंबला आहे. पंरतु शाळा व इतर शैक्षणिक संस्था केव्हा सुरु होणार याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे.

Latest News