सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १७ मध्ये रक्तदान शिबीर संपन्न

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १७ मध्ये रक्तदान शिबीर संपन्न

शहरातील ब्लड बँकांमधील रक्तसाठा लक्षात घेता ४८ बाटल्यांचे संकलन

पिंपरी चिंचवड : शहरातील ब्लड बँकांमधील रक्तसाठा लक्षात घेता आमदार लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार व पिंपरी-चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ९ जून रोजी प्रभाग क्र. 17 मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षनेते नामदेव ढाके यांच्या चिंतामणी चौक येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून ४८ बाटल्यांचे संकलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व पीएसआय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर राबविण्यात आले.
तत्पूर्वी, भारतमाता व राजे छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात झाली. यामध्ये, आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या व सँनिटायझरच्या बाटल्यांचे देखील वाटप करण्यात आले. शिबिरासाठी पीएसआय ब्लड बँकेचे डॉ. दीपक पाटील, अंबादास पटेल यांचे सहकार्य लाभले.
यावेळी नगरसेविका करुणा चिंचवडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस अजित कुलथे, युवती आघाडीच्या देवयानी भिंगारकर, भाजयुमो उपाध्यक्ष भुषण गायके, शक्ति केंद्र प्रमुख कैलास रोटे, भाजयुमोचे पदाधिकारी रूपेश पाटील, प्रदिप पटेल, संदीप पाटील, कुशल नेमाडे, भगवान निकम, योगेश महाजन, राहुल पाचपांडे, राकेश चौधरी, कुणाल इंगळे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News