24 तासांत तब्बल 10 हजार 956 नव्या भारतात कोरोनाची नोंद

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर काल गेल्या २४ तासांत ३९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या ८ हजार ४९८ इतकी झाली आहे.

दरम्यान, पहिल्यांदाच देशात एका दिवसात दहा हजाराहून रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण १ लाख ४७ हजार १९५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख ४१ हजार ८४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Latest News