सचिवाला माराहाण: भाजपची स्टार नेता सोनाली फोगट हिला पोलिसांनी अटक

हिसारमधील भाजी मार्केटमधील बाजार समिती सचिवाला माराहाण केल्या प्रकरणी भाजपची स्टार नेता सोनाली फोगट हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोनालीवर सरकारी कामकाजात दखल देणे, सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोनाली फोगाट या 2019 च्या हरयाणा विधानसभा निवडणूकीत आमदपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढल्या होत्या. मात्र कांग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा पराभव केला होता. 4 जून रोजी सोनाली फोगाट या हिसारमधील मार्केटमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे मार्केट कमिटीचे सचिव सुल्तान सिंह यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर सोनाली यांनी सुल्तान सिंह यांना कानाखाली मारली. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत त्यांनी सुल्तान सिंह यांना चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत सुल्तान सिंह हे सोनाली यांना थांबविण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र संतापलेल्या सोनाली यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.